Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation

कृषी विकासासाठी आमचे कार्य

Years of Experience
0 +

आम्ही कोण आहोत?

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हमीभाव संरक्षण व्यवस्था

शेतमालास उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा हमीभाव संरक्षण देणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी “कृषी पणन मंत्र व तंत्र” ही बिगर सरकारी (NGO) संस्था राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठी सजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPCL) स्थापन करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ९ कृषी मंडळांपैकी नारायणगाव कृषी मंडळांतर्गत ७ तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्या यशस्वीपणे स्थापन झाल्या आहेत. उर्वरित ४७ FPCL कंपन्या स्थापन करण्याचा संस्थेचा मानस आहे.

कृषी व ग्रामीण विकास उपक्रम

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हमीभाव संरक्षण व्यवस्था

                शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित वाजवी नफा आणि हमीभाव संरक्षण देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यासाठी “कृषी पणन मंत्र व तंत्र” ही बिगर सरकारी संस्था राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठी सजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPCL) स्थापन करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ९ कृषी मंडळांपैकी नारायणगाव कृषी मंडळांतर्गत ७ तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या असून उर्वरित ४७ कंपन्या स्थापन करण्याचा मानस आहे. कंपनी स्थापन करताना किमान १० शेतकरी एकत्र येतात—त्यापैकी ५ संचालक आणि ५ संस्थापक सभासद असतात. सभासद संख्या वाढल्यास अतिरिक्त संचालक नियुक्त करण्याची तरतूद आहे. पुढील टप्प्यात जुन्नर तालुक्यातील उर्वरित कृषी मंडळांमध्ये तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही ही व्यवस्था उभारून राज्य व देशव्यापी सशक्त बाजार प्रणाली निर्माण करण्याचा संकल्प आहे.

डिजिटल प्रणाली आणि अंमलबजावणी आराखडा

             या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नारायणगाव (वारूळवाडी) येथील A.B.M. College of Agriculture Business Management तसेच इतर महाविद्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांचे सहकार्य घेतले जाणार आहे. “सवंगडी” मोबाईल ॲपच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना पीक लागवडीखालील क्षेत्र, काढणीचा कालावधी आणि विक्री तपशील मोबाईलवर पाहता येईल. या माहितीच्या आधारे भविष्यातील शेतमाल संकलन केंद्रांसाठी आवश्यक क्षमता, यंत्रणा आणि नियोजन अधिक सुलभ होईल. तालुक्यातील सर्व संकलन केंद्रे संगणक आणि इंटरनेटद्वारे जोडून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल ऑक्शन लिलाव व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न आहे; तसे शक्य न झाल्यास तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची तालुका फेडरेशन व्यवस्था निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे.

प्रमुख उद्देश

विद्यमान परिस्थितीत शेतमाल विक्रीचे प्रकार

पारदर्शकता व जबाबदारी

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी हमीभाव संरक्षण व्यवस्था

शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित वाजवी नफा आणि हमीभाव संरक्षण देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यासाठी “कृषी पणन मंत्र व तंत्र” ही बिगर सरकारी संस्था राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठी सजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPCL) स्थापन करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ९ कृषी मंडळांपैकी नारायणगाव कृषी मंडळांतर्गत ७ तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या असून उर्वरित ४७ कंपन्या स्थापन करण्याचा मानस आहे. कंपनी स्थापन करताना किमान १० शेतकरी एकत्र येतात—त्यापैकी ५ संचालक आणि ५ संस्थापक सभासद असतात. सभासद संख्या वाढल्यास अतिरिक्त संचालक नियुक्त करण्याची तरतूद आहे. पुढील टप्प्यात जुन्नर तालुक्यातील उर्वरित कृषी मंडळांमध्ये तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही ही व्यवस्था उभारून राज्य व देशव्यापी सशक्त बाजार प्रणाली निर्माण करण्याचा संकल्प आहे.

सामूहिक शेतमाल संकलन करून विक्रीस पाठवणे

विक्री मालाची प्रतवारी करून वक्कलांची संख्या कमी होईल. त्यामुळे एकाच प्रकारच्या, एकाच प्रतीच्या शेतमालास दर, घरामध्ये असलेली तफावत, विषमता टाळून मालास योग्य दर मिळेल.

पॅकिंग मटेरियलच्या एकत्रित खरेदीमुळे खर्चाची बचत होईल.

सामूहिक वाहतुकीचा फायदा शेतकरी बांधवांना घेता येईल

वकलांची संख्या घटल्याने जागेची आणि वेळेची बचत होईल व लिलावांची संख्या कमी होईल

प्रतवारी निहाय विक्रीपात्र शेतमालाचे उपलब्धता आणि मागणी यामध्ये असणारी साशंकता दूर होऊन वास्तव निदर्शनास येईल.

शेतमाल प्रतवारी करताना पारदर्शकतेचे शाश्वती शेतकरी व खरेदीदारास येईल.

फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मदतीमुळे रकमेबाबतची शेतकऱ्याची होणारे फसवणूक व रक्कम मिळण्यास होणारा विलंब टाळता येईल.

शेतमालाचे वजन व विक्री बाबत शेतकऱ्याला कायमस्वरूपी शाश्वतता राहील.

शेतमालात सध्या प्रचलित असलेली कडता पद्धत बंद करण्यासाठी पूरक ठरेल..

व्यावसायिक प्रवास

शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार आणि बाजार घटकांमधील समन्वय साधत प्रत्यक्ष समस्यांवर उपाययोजना करण्याचा अनुभव.

विद्यमान परिस्थितीत या सात कंपन्यांच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांनी वैयक्तिक नावाने शेतमाल विकण्याऐवजी गावातील किंवा मळा, वाडी वस्तीतल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमालाचा प्रकार व दर्जानुसार लिलावासाठी प्लॉट उदाहरणार्थ कांद्याच्या प्रत्येकी 5 5 वक्कले तयार करावा. यामुळे प्रतवारीनुसार मोठ्या प्रमाणात शेतमाल एकत्रित करता येईल.

सध्या लिलाव प्रक्रियेत होणारा विलंब आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, प्रतवारीनुसार कंपनीच्या नावे फक्त पाच लॉट तयार करून विक्रीसाठी ची माहिती तपशीलासह कंपनी कार्यालयात द्यावी. यासाठी कंपनी शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करेल.

याशिवाय अनेक शेतकऱ्यांना काढणीच्या वेळी मजूर व्यवस्था पॅकिंग मटेरियल वरील खर्च इतर शेतीची कामे बाजारात मारण्यासाठी लागणारा वेळ आणि दरातील अनिश्चितता यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शेतमाल ठराविक दराने किंवा उधडा विकतात. मात्र याची कुठेही लिखित नोंद नसल्यामुळे व्यापारी वेळेत पैसे देत नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतात.

या पंधरा गावातील सात तलाठी सजा फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड कंपन्यांचे सभासद होऊन प्रत्येक गावातील वाडी वस्ती मळ्यावर समूह तयार करतील. या समूहातील शेतकरी आपला शेतमाल स्वतंत्रपणे विक्री न करता शेतमालाच्या प्रकारानुसार एकत्र संकलित करून प्रतवारीसाठी निवड करतील. उदाहरणार्थ एका मळ्यात कांदा टोमॅटो तरकारी पालेभाज्या फळे यांचे नग किंवा वजन नोंदवून एकत्रित प्रतवारीनुसार लॉट तयार केले जातील. त्यामुळे एका प्रकारच्या शेतमालासाठी विविध शेतकऱ्यांच्या अनेक वकले होण्याऐवजी प्रत्येक प्रतवारीनुसार एकसमान वकले किंवा लॉट तयार होतील आणि मिळणारा दर प्रतवारी निहाय एकच राहील. नंतर हा शेतमाल कोणत्या बाजारात आणि कोणत्या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी नेऊ शकतो हे ठरवले जाईल. संबंधित शेतकऱ्यांनी एकमताने कंपनीमध्ये नोंदणी करून कंपनीच्या नावाने आपला माल पाठवावा ज्यामुळे कंपनीचे ब्रॅण्डिंग होईल. विक्री झाल्यानंतर रक्कम कंपनीच्या खात्यात जमा होईल आणि खर्च वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा केली जाईल.

ज्या शेतकऱ्यांना शेतमाल स्थानिक व्यापाऱ्याकडे देणे सोयीचे वाटते त्यांनी पीकनिहाय एकत्र येऊन ठराविक व्यापाऱ्यास दर निश्चित करून देण्याचा निर्णय घ्यावा. दर अटी व शर्ती निश्चित करून त्याच्या तीन प्रती लिहून ठेवाव्यात. एक प्रत संबंधित व्यापाऱ्यास एक प्रत शेतकरी समूहास आणि तिसरी प्रत कंपनीकडे दाखल करावी, अशाप्रकारे व्यवहार केल्यास  अडचणी आणि समस्या टाळता येतील.

यामुळे बाजारपेठांमधील लॉट ची संख्या कमी होईल आणि प्रतवारीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला मिळणाऱ्या बाजारभावातील विषमता संपुष्टात येईल. कंपनीचे स्वतःचे शेतमाल संकलन केंद्र उभे राहीपर्यंत या हंगामी कालावधीसाठी हा विचार अमलात आणता येईल. नंतर जेव्हा शेतमाल संकलन केंद्र बांधून पूर्ण होईल तेव्हा ही संकल्पना राबविणे अधिक सुलभ आणि शाश्वत ठरेल. शेतमाल संकलन केंद्राच्या या सरावानंतर प्रत्यक्षात ही संकल्पना अमलात आणणे सोपे जाईल.

तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंपनीचा ब्रँड निर्माण झाल्यास दर्जाबाबत पारदर्शकता वाढेल. यामुळे खरेदीदारांचा विश्वास वाढून शेतमालाच्या दरात वाढ होण्यास मदत होईल. या माहितीपत्रकात नमूद केलेल्या शेतमाल संकलन केंद्राच्या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कालावधी शासनाची भूमिका तसेच संभाव्य अडचणी यांचा विचार करता हा कालावधी कमी आणि सुलभ करण्यासाठी वरील संकल्पना उपयुक्त ठरेल यामुळे शेतकऱ्यांचा तोटा कमी होण्यास मदत होईल.

डिजिटल ऑक्शन सेंटर मध्ये शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रकारासाठी त्याचे नमुने आणि उपलब्धतेची माहिती दिली जाईल. महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदांमधील घाऊक खरेदीदार (परप्रांतातील खरेदीदार, निर्यातदार व प्रक्रिया कार) थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही. यामुळे शेतमालाच्या प्रती वजन अनधिकृत कपाती व रकमेबाबत तक्रारी उद्भवणार नाहीत. शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर होणारा खर्च उदाहरणार्थ शेतमाल निवडणे, पॅकिंग मटेरियल, लेबर चार्ज, शेतमाल चढ उतार खर्च व वाहतुकीचे खर्च सामूहिक पातळीवर असल्याने कमी होऊन श्रमाची व वेळेची बचत होऊन नियोजन सुलभ होईल.

तलाठी सजा फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड माध्यमातून शेतमाल खरेदी केल्यास शेतमालाचे पॅकिंग मटेरियल, लेबर चार्जेस, लोडिंग अनलोडींग चार्जेस व वाहतूक खर्च शेतमाल खरेदी करणाऱ्या खरेदी दारात कंपनीला द्यावा लागेल. शिवाय तालुक्यातील तलाठी सजा क्षेत्रासाठी शेतमालाच्या उत्पादन खर्चावरून वाजवी नफा व हमीभाव संरक्षण देणारी व्यवस्था लक्षात घेता त्यापेक्षा जास्त दर मागणी करता येईल.

जर एखाद्या वेळेस शेतमालाची योग्य मागणी झाली नाही तर तो शेतमाल संकलन केंद्रात सुरक्षित ठेवण्याचे किंवा इतर प्रक्रियेसाठी पर्याय उपलब्ध असतील. आणि शेतमाल शिल्लक राहिल्यास त्यावरील खर्चाने लागतात त्याच जागी गॅस व खत निर्मितीसाठी वापर करता येईल त्यामुळे मागणी व पुरवठ्याचे नियंत्रण राखणे शक्य होईल.

शेतमाल संकलन केंद्र सुरू झाल्यानंतर सभासदांकडून सुरुवातीला घेतलेले पाच हजार रुपये शेअरची गुंतवणूक पिक विमा योजनेमध्ये भांडवलात रूपांतर केली जाईल. अशाप्रकारे कंपनीचे 52% शेअर्स, 24 टक्के राज्य शासनाचे 24% केंद्र शासनाचे होऊन भांडवल उभारून तालुका पिक विमा योजना कार्यान्वित केली जाईल. तसेच शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाच्या किंमतीवर (प्रति किलो, प्रतिक्विंटल अथवा प्रति टन) आधारित पिक विमा हप्त्यातील रकमेमधून नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराईमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई तसेच दरातील चढ उतारामुळे उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव संरक्षणासाठी तरतूद करता येईल.

मात्र यासाठी ‘आज पेरले, लगेच उगवले, शिजवले आणि खाल्ले ‘ अशा अपेक्षांवर आधारित त्वरित निर्णय घेणे हानिकारक ठरू शकते. म्हणून प्रत्येक तलाठी सजा क्षेत्रासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून दैनंदिन व वार्षिक अहवाल तसेच तीन आर्थिक वर्षांच्या तपशिलावर आधारित निष्कर्षांनी घेतलेले निर्णय शेतकरी व शेतमालाच्या हितासाठी पूरक ठरतील.

शेतमाल संकलन केंद्र उभारण्यासाठी प्रत्येक तलाठी सजा क्षेत्रासाठी आवश्यक जागा आणि यंत्रणेची क्षमता लक्षात घेता लागणारा निधी पुढील प्रमाणे उभा करावा लागेल. शेतकरी सहभागातून दहा पैसे, राज्य शासनातून दहा पैसे, केंद्रशासनातून 10 पैसे, उर्वरित 70 पैसे मुदतीच्या कमी व्याजदराच्या नाबार्ड कर्ज स्वरूपात यासाठी राज्य शासन, केंद्रशासन आणि नाबार्ड यांना त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये ही तरतूद करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा लागेल. तसेच संपूर्ण राज्यात व देशात अशा प्रकारच्या तलाठी सजा फार्म प्रोडूसर कंपन्या स्थापन करून आपली क्षमता सिद्ध करणे आवश्यक आहे. यामुळे राज्य किंवा केंद्रशासन तातडीने दखल घेऊन शीघ्र कारवाही करण्यास प्रवृत्त होईल.

चला, एकत्र येऊया शेतकरी सक्षमीकरणासाठी

प्रत्येक गावातील शेतीनिष्ठ तरुणांनी तलाठी सजा निहाय फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यासाठी सहकार्य करावे.

सरकारची भूमिका आणि सहकार्य

कृषी पणन मंत्र आणि तंत्र फाउंडेशनने तयार केलेले “सवंगडी मोबाईल ॲप” केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी पणन धोरणांशी जोडण्यासाठी नाबार्ड आणि इतर संस्थांकडून सहकार्य अपेक्षित आहे. पारदर्शक व निकोप स्पर्धेमुळे बाजारातील मागणी व पुरवठा यांचा समतोल प्रभावीपणे राखला जाईल.

हंगामी शेतमाल विक्री वितरण व्यवस्था.

तालुक्यातील 54 शेतमाल संकलन केंद्रांमध्ये संकलित झालेल्या शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारी करून विक्रीपात्र शेतमाल त्याच्या प्रकरनिहाय प्रतवारिनिहाय टनामध्ये उपलब्ध आहे, याची वर्गवारी खालीलप्रमाणे.

1. नाशवंत नसलेला दीर्घकाळ टिकणारा

2. नाशवंत मात्र 4 दिवस अल्पकाळ टिकणारा

3. अतिशिघ्र नाशवंत 24 तास टिकणारा.

याप्रमाणे शेतमालाच्या प्रकारानिहाय 54 कंपन्यांचे ब्रँडिंग असलेल्या प्रतनिहाय नमुना आणि उपलब्धता ही डिजिटल बोर्डावर प्रसारित होईल.संबंधित उर्वरित शेतमाल हा त्या त्या कंपन्यांचे वेअर हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज मध्ये असेल आणि खरेदी दाराच्या मागणीनुसार त्याचे पॅकिंग करून देण्याची व्यवस्था संकलन केंद्रावर उपलब्ध असेल मात्र पॅकिंग मटेरियल हे संबंधित खरेदीदाराचे असेल.

     शिवाय या डिजिटल ऑक्शन सेंटर शिवाय या तालुक्यात कुठेही हा शेतमाल उपलब्ध होणार नसल्यामुळे ज्यांना ज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि पसंतीनुसार तुम्हाला खरेदी करावयाचा आहे त्यांनी तो डिजिटल ऑक्शन सेंटरमधून उपलब्ध असल्यामुळे विक्रीपात्र शेतमालाचे उपलब्धता किती आहे याची तपशीलवार माहिती त्यास डिजिटल क्षेत्राचे माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
अशा इच्छुक खरेदीदारांनी आपल्याला कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या प्रतीचा शेतमाल उपलब्ध आहे आणि गरज किती आहे, त्यानुसार दर आणि किती टन आणि कोणत्या पॅकिंग मध्ये घ्यावा लागणार आहे याची माहिती डिजिटल ऑक्शन बोर्ड च्या माध्यमातून डिजिटली नोंदवावी लागेल. त्यानुसार होणाऱ्या रकमेची पूर्तता बोर्ड कडून कार्ड देण्याची व्यवस्था करील. त्यामुळे शेतमालाची प्रकारनिहाय प्रतिनिहाय मागणी डिजिटल बोर्डला पारदर्शी निकोप स्पर्धा होऊन स्पर्धात्मक दर मिळेल. मात्र हा दर डिजिटल ऑक्शन बोर्डाकडे प्रत्येक कंपनी द्वारा पिकनिहाय शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा एकत्र करून जो सरासरी दर निश्चित होईल या दरापेक्षा जास्त दरांमध्ये ही स्पर्धात्मक दराची मागणी नोंदविणे बंधनकारक राहील. अन्यथा संबंधित शेतमालाचा प्रतिनिहाय लिलाव होणार नाही. 

    ज्या अर्थी संबंधित शेतमालाचा लिलाव स्थगित होईल अशावेळी शेतमालाला संरक्षण देण्याची व्यवस्था शेतमाल संकलन केंद्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे शेतमालाला संरक्षण मिळेल. आणि मागणी व पुरवठा नियंत्रित करण्याच्या दृष्टीने संबंधित शेतमाल प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. याशिवाय अतिरिक्त नाशवंत आणि शीघ्र नाशवंत या शेतमालाचे अनावश्यक लोडिंग, अनलोडिंग, ट्रान्सपोर्ट आणि पॅकिंग खर्च इत्यादी होण्याऐवजी बाजारपेठेत अतिरिक्त आवक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने अशा शेतमालापासून ऊर्जा आणि खत निर्मिती करण्याची व्यवस्था संकलन केंद्रावर उपलब्ध केली जाईल. अशाप्रकारे कंपनीकडे उपलब्ध होणारा ऊर्जास्रोत स्वतः वापरेल आणि निर्माण होणारे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना योग्य किमतीत वितरण करणे शक्य होईल.

Our Team

You’ve got a move to make, and we’re here to help

तरुणांना सुवर्णसंधी

      कृषी पणन मंत्र आणि तंत्र फाउंडेशनची ही नाविन्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी एक क्रांतिकारी आणि आदर्श मॉडेल ठरू शकते. जुन्नर तालुक्यातील यशस्वी अंमलबजावणी आणि सकारात्मक परिणामांनंतर, आता हे मॉडेल संपूर्ण देशात विस्तारण्याची मोठी संधी आपल्यासमोर आहे. केवळ शेतमालाची विक्रीच नव्हे, तर मूल्यवर्धन आणि साखळी व्यवस्थापनाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याकामी मी देशातील सुशिक्षित युवा पिढीला आणि कृषीनिष्ठ तरुणांना असे आवाहन करतो की, आपल्या कृषीप्रधान देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बळीराजाला सक्षम करण्यासाठी ‘कृषी पणन मंत्र आणि तंत्र फाउंडेशन’च्या उपक्रमांत आपण मोठ्या संख्येने क्रियाशील सहभागी व्हावे. या सहभागातून केवळ शेतकऱ्यांचा फायदाच होणार नाही, तर ग्रामीण स्तरावर कृषी उद्योजकता, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात युवा तरुणांना रोजगाराच्या व करिअरच्या अमाप संधी उपलब्ध होणार आहेत.