Krushi Panan Mantra Ani Tantra Foundation
शेतमालास उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा हमीभाव संरक्षण देणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी “कृषी पणन मंत्र व तंत्र” ही बिगर सरकारी (NGO) संस्था राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठी सजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPCL) स्थापन करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ९ कृषी मंडळांपैकी नारायणगाव कृषी मंडळांतर्गत ७ तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्या यशस्वीपणे स्थापन झाल्या आहेत. उर्वरित ४७ FPCL कंपन्या स्थापन करण्याचा संस्थेचा मानस आहे.
शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित वाजवी नफा आणि हमीभाव संरक्षण देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यासाठी “कृषी पणन मंत्र व तंत्र” ही बिगर सरकारी संस्था राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठी सजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPCL) स्थापन करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ९ कृषी मंडळांपैकी नारायणगाव कृषी मंडळांतर्गत ७ तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या असून उर्वरित ४७ कंपन्या स्थापन करण्याचा मानस आहे. कंपनी स्थापन करताना किमान १० शेतकरी एकत्र येतात—त्यापैकी ५ संचालक आणि ५ संस्थापक सभासद असतात. सभासद संख्या वाढल्यास अतिरिक्त संचालक नियुक्त करण्याची तरतूद आहे. पुढील टप्प्यात जुन्नर तालुक्यातील उर्वरित कृषी मंडळांमध्ये तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही ही व्यवस्था उभारून राज्य व देशव्यापी सशक्त बाजार प्रणाली निर्माण करण्याचा संकल्प आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नारायणगाव (वारूळवाडी) येथील A.B.M. College of Agriculture Business Management तसेच इतर महाविद्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांचे सहकार्य घेतले जाणार आहे. “सवंगडी” मोबाईल ॲपच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना पीक लागवडीखालील क्षेत्र, काढणीचा कालावधी आणि विक्री तपशील मोबाईलवर पाहता येईल. या माहितीच्या आधारे भविष्यातील शेतमाल संकलन केंद्रांसाठी आवश्यक क्षमता, यंत्रणा आणि नियोजन अधिक सुलभ होईल. तालुक्यातील सर्व संकलन केंद्रे संगणक आणि इंटरनेटद्वारे जोडून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल ऑक्शन लिलाव व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न आहे; तसे शक्य न झाल्यास तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची तालुका फेडरेशन व्यवस्था निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे.
Malesuada elit laoreet quisque facilisi vivamus fringilla. Augue felis nostra posuere urna si mattis ultrices natoque nulla curabitur laoreet. Iaculis ligula hendrerit mollis egestas vulputate inceptos hac massa.



शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित वाजवी नफा आणि हमीभाव संरक्षण देणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यासाठी “कृषी पणन मंत्र व तंत्र” ही बिगर सरकारी संस्था राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठी सजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (FPCL) स्थापन करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ९ कृषी मंडळांपैकी नारायणगाव कृषी मंडळांतर्गत ७ तलाठी सजा फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या असून उर्वरित ४७ कंपन्या स्थापन करण्याचा मानस आहे. कंपनी स्थापन करताना किमान १० शेतकरी एकत्र येतात—त्यापैकी ५ संचालक आणि ५ संस्थापक सभासद असतात. सभासद संख्या वाढल्यास अतिरिक्त संचालक नियुक्त करण्याची तरतूद आहे. पुढील टप्प्यात जुन्नर तालुक्यातील उर्वरित कृषी मंडळांमध्ये तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही ही व्यवस्था उभारून राज्य व देशव्यापी सशक्त बाजार प्रणाली निर्माण करण्याचा संकल्प आहे.
सामूहिक शेतमाल संकलन करून विक्रीस पाठवणे
विक्री मालाची प्रतवारी करून वक्कलांची संख्या कमी होईल. त्यामुळे एकाच प्रकारच्या, एकाच प्रतीच्या शेतमालास दर, घरामध्ये असलेली तफावत, विषमता टाळून मालास योग्य दर मिळेल.
पॅकिंग मटेरियलच्या एकत्रित खरेदीमुळे खर्चाची बचत होईल.
सामूहिक वाहतुकीचा फायदा शेतकरी बांधवांना घेता येईल
वकलांची संख्या घटल्याने जागेची आणि वेळेची बचत होईल व लिलावांची संख्या कमी होईल
प्रतवारी निहाय विक्रीपात्र शेतमालाचे उपलब्धता आणि मागणी यामध्ये असणारी साशंकता दूर होऊन वास्तव निदर्शनास येईल.
शेतमाल प्रतवारी करताना पारदर्शकतेचे शाश्वती शेतकरी व खरेदीदारास येईल.
फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मदतीमुळे रकमेबाबतची शेतकऱ्याची होणारे फसवणूक व रक्कम मिळण्यास होणारा विलंब टाळता येईल.
शेतमालाचे वजन व विक्री बाबत शेतकऱ्याला कायमस्वरूपी शाश्वतता राहील.
शेतमालात सध्या प्रचलित असलेली कडता पद्धत बंद करण्यासाठी पूरक ठरेल..
कृषी पणन मंत्र आणि तंत्र फाउंडेशनने तयार केलेले “सवंगडी मोबाईल ॲप” केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी पणन धोरणांशी जोडण्यासाठी नाबार्ड आणि इतर संस्थांकडून सहकार्य अपेक्षित आहे. देशातील प्रत्येक तालुक्यात अशी योजना राबविली गेल्यास शेतकर्यांना उत्पादन खर्चावर आधारित वाजवी नफा आणि हमीभाव मिळू शकेल.
तालुक्यातील 54 शेतमाल संकलन केंद्रांमध्ये संकलित झालेल्या शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारी करून विक्रीपात्र शेतमाल त्याच्या प्रकरनिहाय प्रतवारिनिहाय टनामध्ये उपलब्ध आहे, याची वर्गवारी खालीलप्रमाणे.
याप्रमाणे शेतमालाच्या प्रकारानिहाय 54 कंपन्यांचे ब्रँडिंग असलेल्या प्रतनिहाय नमुना आणि उपलब्धता ही डिजिटल बोर्डावर प्रसारित होईल.संबंधित उर्वरित शेतमाल हा त्या त्या कंपन्यांचे वेअर हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज मध्ये असेल आणि खरेदी दाराच्या मागणीनुसार त्याचे पॅकिंग करून देण्याची व्यवस्था संकलन केंद्रावर उपलब्ध असेल मात्र पॅकिंग मटेरियल हे संबंधित खरेदीदाराचे असेल.
शिवाय या डिजिटल ऑक्शन सेंटर शिवाय या तालुक्यात कुठेही हा शेतमाल उपलब्ध होणार नसल्यामुळे ज्यांना ज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि पसंतीनुसार तुम्हाला खरेदी करावयाचा आहे त्यांनी तो डिजिटल ऑक्शन सेंटरमधून उपलब्ध असल्यामुळे विक्रीपात्र शेतमालाचे उपलब्धता किती आहे याची तपशीलवार माहिती त्यास डिजिटल क्षेत्राचे माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
अशा इच्छुक खरेदीदारांनी आपल्याला कोणत्या प्रकारचा आणि कोणत्या प्रतीचा शेतमाल उपलब्ध आहे आणि गरज किती आहे, त्यानुसार दर आणि किती टन आणि कोणत्या पॅकिंग मध्ये घ्यावा लागणार आहे याची माहिती डिजिटल ऑक्शन बोर्ड च्या माध्यमातून डिजिटली नोंदवावी लागेल. त्यानुसार होणाऱ्या रकमेची पूर्तता बोर्ड कडून कार्ड देण्याची व्यवस्था करील. त्यामुळे शेतमालाची प्रकारनिहाय प्रतिनिहाय मागणी डिजिटल बोर्डला पारदर्शी निकोप स्पर्धा होऊन स्पर्धात्मक दर मिळेल. मात्र हा दर डिजिटल ऑक्शन बोर्डाकडे प्रत्येक कंपनी द्वारा पिकनिहाय शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक वाजवी नफा एकत्र करून जो सरासरी दर निश्चित होईल या दरापेक्षा जास्त दरांमध्ये ही स्पर्धात्मक दराची मागणी नोंदविणे बंधनकारक राहील. अन्यथा संबंधित शेतमालाचा प्रतिनिहाय लिलाव होणार नाही.
ज्या अर्थी संबंधित शेतमालाचा लिलाव स्थगित होईल अशावेळी शेतमालाला संरक्षण देण्याची व्यवस्था शेतमाल संकलन केंद्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे शेतमालाला संरक्षण मिळेल. आणि मागणी व पुरवठा नियंत्रित करण्याच्या दृष्टीने संबंधित शेतमाल प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. याशिवाय अतिरिक्त नाशवंत आणि शीघ्र नाशवंत या शेतमालाचे अनावश्यक लोडिंग, अनलोडिंग, ट्रान्सपोर्ट आणि पॅकिंग खर्च इत्यादी होण्याऐवजी बाजारपेठेत अतिरिक्त आवक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने अशा शेतमालापासून ऊर्जा आणि खत निर्मिती करण्याची व्यवस्था संकलन केंद्रावर उपलब्ध केली जाईल. अशाप्रकारे कंपनीकडे उपलब्ध होणारा ऊर्जास्रोत स्वतः वापरेल आणि निर्माण होणारे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना योग्य किमतीत वितरण करणे शक्य होईल.
कृषी पणन मंत्र आणि तंत्र फाउंडेशन ची संकल्पना शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकते.
जुन्नर तालुक्यातील यशस्वी अंमलबजावणीनंतर संपूर्ण देशात याचा प्रसार आणि प्रचार केला जाऊ शकतो यासाठी युवा तरुणांना असे आवाहन करतो की आपण आपल्या कृषीप्रधान देशांच्या विकासास व शेतकरी बांधवांच्या कृषी म्हणून विकासासाठी मोठ्या संख्येने कृषीपण मंत्र आणि तंत्र फाउंडेशन च्या उपक्रमांक क्रियाशील सहभागी व्हावे. या सहभागातून युवा तरुणांना रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक गावातील शेतीनिष्ठ तरुणांनी तलाठी सजा निहाय फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करण्यासाठी सहकार्य करावे.